
आंतरराष्ट्रीय रंग दिवस” आणि “जागतिक डाउन सिंड्रॉम दिवस
- 11:00 am - 6:00 pm
- kanjurmarg
“आंतरराष्ट्रीय रंग दिवस” आणि “जागतिक डाउन सिंड्रॉम दिवस”, यांचे औचित्य साधून “श्रीरंग चॅरिटेबलं ट्रस्ट” च्या वतीने एका खास चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
20/03/2021 रोजी सायंकाळी 4.00 वा. जॉली अड्डा आर्ट गॅलरी, कांजूरमार्ग ( पूर्व ), येथे या खास चित्र प्रदर्शनाचे उदघाटन, सामाजिक प्रश्नांना आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून वाचा फोडणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार पदमश्री श्री. सुधारक ओलवे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी श्रीरंग चॅरीटेबलं ट्रस्टचे योगिता तांबे, संदेश कदम, प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी पालव तसेच विशेष अतिथी म्हणून दिग्दर्शक श्री. विजू माने व अभिनेते श्री. कुशल बद्रीके ह्यावेळी उपस्थित होते.
ह्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व चित्रे दृष्टीहीन, मतिमंद, तृतीयपंथीय आणि जळीत पीडित व्यक्तींनी काढली आहेत.
दृष्टीहीन व्यक्तींना रंग ओळखणे सोपे होण्यासाठी गंधाची मदत घेता येते. जसे लाल म्हणजे गुलाब, हिरवा म्हणजे गवती चहा इत्यादी…
“श्रीरंग चॅरेटॅबल ट्रस्ट”च्या “रंगगंध” या उपक्रमाअंतर्गत दृष्टीहीन व्यक्तींनी या प्रदर्शनातील चित्र रेखाटली आहेत. हा उपक्रम जगभरात नेण्याचा या ट्रस्टचा मानस आहे.
अश्या प्रकारचे प्रदर्शन समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देईल, रंगगंधच्या अश्या प्रकारचे प्रकल्प आणि कार्यक्रम समाजामध्ये बदल घडवतील असे मत श्री सुधाकर ओलवे सरांनी यावेळी व्यक्त केले.
रंगगंधमधील अश्या कार्यक्रमामध्ये मलाही चित्र रंगावायला आवडेल असे प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रीके यांनी यावेळी म्हटले.
याप्रसंगी दिग्दर्शक श्री. विजू माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मनोरंजन विश्वाच्या मुख्य प्रवाहात विशेष व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
हे प्रदर्शन जॉली अड्डा आर्ट गॅलरी कांजूरमार्ग ( पूर्व ), येते 20, 22 आणि 23 मार्च रोजी, सकाळी 11 ते सायं. 6 वा. पर्येंत सर्वांसाठी खुले राहील.
For more details: https://www.shreerang.org/ranggandha/